मुरघास बनविण्याचे उद्देश

  1. अतिरिक्त हिरव्या वैरणीतील पोषणमूल्य घटकांचे जतन करणे, (टिकविणे) यासाठी हवाबंद (अनअेरोबीक) पध्दतीने वैरण आंबविणे (मुरविणे).
  2. हिरव्या वैरणीच्या कमतरतेच्या काळात (हिरव्या वैरण उपलब्धतेच्या टंचाई कालावधीत) हिरव्या वैरणला पर्याय म्हणून, मूरघास तयार करुन पशुधनासाठी पोषणमूल्य वैरण उपलब्ध करणे.
  3. हिरवी वैरण उत्पादनासाठी वारंवार येणा-या उत्पादन खर्चात बचत करणे.
  4. पशुधनासाठी पोषणमूल्य वैरण दीर्घकाळ (4 ते 6 महिने)जास्तीत जास्त 28 ते 30 महिने (मुरघासाचे आग, पाणी, ओलावा, बुरशी व इतर घटक यापासून संरक्षण घेण्याची काळजी घेतल्यास) साठवून टंचाई काळात वापर करता येतो.
  5. वैरण हाताळतांना/साठवताना होणारी तूट कमी करता येते.
  6. मुरघास पध्दतीने वैरणीची प्रत/दर्जा कायम राखता येतो.
  7. पावसाळयात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने अतिरिक्त हिरवी वैरण वाळवून साठवण करणे, अडचणीची जाते. अशा वेळी वैरणीचे मुरघासात रुपांतर करुन वैरणीचे नुकसान टळते.
  8. वैरण कमी जागेत साठवून टिकविता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *